STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

स्मरण स्त्री पर्वाचे...ती च्या आरोग्याचे..!



आरोग्य ही आपल्या जीवनाची अतिशय महत्त्वाची बाजू अन "स्त्रियांचे आरोग्य" हा तर आपल्या कौटुंबिक जीवनाचा आधारस्तंभ.

    सध्या घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना  स्त्रियांना स्वतः च्या शरीराकडे पुरेसे लक्ष देता येत नाही त्यामुळे थकवा येणे, रक्ताची कमतरता,वजन कमी होणें अथवा जास्त वाढने,कमी वयात सांधेदुखी सारखे त्रास,मासिक पाळीच्या तक्रारी तसेच अति तणावामुळे चिडचिड होणे,झोप कमी होणे, मनाची अस्थिरता अश्या अनेक समस्यांना स्त्रियांना सामोरे जावे लागते.

     हे सर्व टाळण्यासाठी आणि नेहमी निरोगी राहण्यासाठी 'आयुर्वेदीय जीवनशैली' चा नियमित वापर करणे फार गरजेचे वाटते.मागील वर्षात कोरोनाच्या काळातही आयुर्वेदीय जीवनशैली व उपचार पद्धतीमुळे आरोग्य दर्जा उत्तम ठेवण्यास आम्हास यश आले.

    आहार हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.आहार हा हलका व ताजा असावा.फळभाज्या, पालेभाज्या ,मूग डाळ यांचा योग्य तो समावेश असावा.फास्ट फूड टाळावे. नियमित फळांचे सेवन करावे. दूध,तूप ,ड्राय फ्रुटस गूळ शेंगदाणे यांचा आहारात समावेश करावा.

     समतोल आहाराबरोबर नियमित व्यायामाचीही गरज आहे.रोजचे काम हाच व्यायाम आहे हे न समजता दररोज सूर्यनमस्कार, चालणे ठराविक आसने हे नियमित ठेवणे गरजेचे आहे.

     मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचार ठेवणे,नेहमी आनंदी व समाधानी राहणे महत्वाचे आहे.मन निरोगी तर शरीर ही निरोगी राहते.

     यातूनही जर काही आजार उत्पन्न झालेच तर आयुर्वेद उपचार पद्धतीचा जरूर वापर करावा.नैसर्गिक औषधामुळे शरीराचे एक प्रकारे पोषणच होत राहते.या बरोबरच 'पंचकर्म' करून घेणे महत्त्वाचे आहे.

     मेकअप मुळे जसे तुम्ही बाह्यतः सुंदर दिसता पंचकर्माने अंतरशुद्धी होऊन तुमचे सौन्दर्य टिकून राहते.'बस्ती'हे पंचकर्म स्त्रियांसाठी खूप उपयुक्त ठरते.वजन कमी करणे,मासिक पाळीच्या तक्रारी,वंध्यत्व, सौन्दर्य विषयक समस्या सांध्यांचे आजार,मणक्याचे विकार यामध्ये स्त्रीयांसाठी 'बस्ती' हा 'पंचकर्म 'प्रकार वरदान ठरत आहे.स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी 'शिरोधारा'उपयुक्त ठरत आहे.चिकिस्ते साठी  आहाराचे सुयोग्य नियोजन करण्यासाठीआपल्या जवळच्या 'आयुर्वेदाचार्य 'चा सल्ला अवश्य घ्यावा.

   सर्व महिलांना "महिला दिनाच्या" आरोग्यदायी शुभेच्छा.!

      
डॉ सायली सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद भिलवडी, जि सांगली
मोबा:9822974748 / 9975913292














संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909