STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

पंचकर्म चे पुर्वकर्म स्नेहन

स्नेहन



पंचकर्म चे पूर्वकर्म समजल्या जाणाऱ्या उपक्रम विषयी आपण माहिती घेऊया.

स्नेहन म्हणजे तैल ,तूप या सारखे स्निग्ध पदार्थ शरीरासाठी शास्त्रोक्त पध्दतीने बाह्यत:(बाहेरून)/अभ्यंतर (पोटातून) जी उपाय योजना केली जाते त्यास स्नेहन असे म्हणतात.कोणतेही पंचकर्म करण्यापूर्वी स्नेहनाची आवश्यकता असते.
आंघोळी नतंर केसांना तैल लावणे,कानांत तैल सोडणे,तळपायाला काशा च्या वाटीने तैल लावणे,दिवाळीचे अभ्यंग स्नान असेल,पोट साफ होत नसताना पोटातून एरंडेल तैल घेणे असे प्रकार म्हणजे स्नेहन च होय.

स्नेहनाचे महत्त्व:

कोणताही आजार वात,पित्त कफ बिघडल्याशिवाय होऊ शकत नाही.वातावर विजय मिळवण्यासाठी प्रधान उपक्रम स्नेहन च होय.कोणत्याही पंचकर्म ची सुरुवात स्नेहनानेच होते .भले ते बाह्य असो वा अभ्यंतर. ज्या प्रमाणे तुपाने माखलेल्या भांड्यामध्ये कोणताही पदार्थ टाकल्या नंतर न चिकटता बाहेर पडतो तसेच स्नेहन वा स्वेदनामुळे पंचकर्म उपचार करताना वाढलेले दोष शरीराबाहेर काढणे सोपे होते.



स्नेहनाचे फायदे: 

अनेक प्रकारच्या वात विकारा मध्ये नुसत्या स्नेहन स्वेदनाने उत्तम गुण येतो.सांधेदुखी, पाठदुखी,कंबर दुखी ,त्वचा विकार,पित्त विकार अशा विकारा मध्ये औषधी सिद्ध तैल तुपाचा वापर करून स्नेहन पूर्वक पंचकर्म केल्यास आजार मुळापासून नष्ट होतो.
नित्य स्नेहनाने शरीर सदृढ होते,बळकट होते,शरीर कांती सुधारते, भूक वाढते,आयुष्यवृद्धी व आरोग्य प्राप्ती होते.प्रत्येकाने आंघोळी पूर्वी तीळ तैल ने स्नेहन करावे व गरम पाण्याने आंघोळ करावी या मुळे निश्चितच आरोग्यप्राप्ती होईल यात शंका नाही.अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्यचा सल्ला घ्यावा.

संपर्क:
डॉ सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय. भिलवडी जि सांगली.
मोबा.9822974748






संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909