STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

संधिवात व पाठीच्या मणक्याचे आजार व उपचार :

sandhi
संधिवात व पाठीच्या मणक्याचे आजार व उपचार :
ताठ मानेने जगायचं असेल तर पाठीचा कणा कणखर असायला हवा. पण ताठ मानेने जगण्यासाठी बदलेली जीवनशैली, पौष्टिक नसलेला आहार, शक्तीपेक्षा अधिक काम त्यामुळे पाठीच्या मणक्याची झीज होते. जसे कंबर दुखणे, हात दुखणे, मान दुखणे यामुळे वरवर सुखी दिसणारा माणूस वातरोगी झालेला आहे. वात हा जरी एक असला तरी दुखणाऱ्या भागावर दोषानुसार वाताचे ८0 प्रकार पडतात.प्रत्येक वेळा तो संधिवातच असेल असे नाही. उदा. व्यवहारात आपण कष्ट करून ज्वारीला भरघोस कणसं आली आणि पाखरं मात्र कणसातील दाणे टिपायला लागले तर तुम्ही स्वस्थ राहाल का नाही ना! शेतात गोफण घेऊन पाखरांचा प्रतिकार करायला सज्ज व्हाल ना! अगदी वेगवेगळी दुखणी म्हणून रडत बसण्यापेक्षा, सगळ्या दुखान्याचं मुळ काय तर हा ‘वात’.मग जरा आपण औषधाने व पंचकर्म(बस्तीने) हा वातच आटोक्यात आणला तर.....
वाताचे काही आजार :

- मणक्याचे विकार (पाठ, कंबरदुखी) :-
स्पाॅन्डीलायसिस, मणक्याचे गॅप, मणक्याची झीज मनका सरकणे, हातापायाची आग होणे, हात पायाला मुंग्या येणे, जड होणे.

- गुडघे दुखणे :-
गुडघ्यात पाणी होणे, आवाज येणे, हाडाची झीज होणे.

- संधिवात :-
सतत सांधे दुखणे, सांधे सुजणे.

- आमवात :-
एकाच वेळी अनेक सांधे राहून राहून दुखणे.

- अर्धाँगवायू /पक्षघात :-
शरीराच्या भागाची हालचाल व संवेदना जाणे.

- पॅरालिसिस(लकवा) :-
हातपाय वाकडे, लुळे होणे.

- गृध्रसीवात :-
कमरेच्या खुब्यापासून वेदना होणे, मांड्या,गुडघा व घोटा यात वेदना,हातापायात मुंग्या येणे व चमक भरणे.

- सिरागत वात :-
सार्वागास ठणका लागणे, सकाळी उठल्यावर जास्त त्रास असणे, हातापायाच्या शिरा मोठ्या होणे, सांधे वाकडे होणे, मुरगळणे.
- दौर्बल्यातून होणारा त्रास :-
रक्त कमी असणे, आजारानंतर येणाऱ्या थकव्याने वाढणारा वात.

 खरच... दोन पोलादाचे बार एकमेकावर घासले तरी काही काळाने ते उगळून गुळगुळीत होतात, परंतु... मणक्याच्या बाबतीत असं घडत नाही.कारण मणक्याची झीज भरून काढणाऱ्या भागाकडून ती भरून येत असते.

- मग हाडांची झीज का होते 
अस्थि पोषक तत्वाचा अभाव व पोषण करणाऱ्या मार्गात येणारा अडथळा या दोनच गोष्टींनी हाडांची झीज व मणक्यातील चक्त्यांची झीज होते.या गोष्टी सुधारल्या तर इतर हाडाप्रमाणे मणक्याच्या हाडांची झीज भरून काढता येते.
बस्ती उपचार-वाताच्या आजारांसाठी वरदान :-

बस्ती उपचार म्हणजे(संडासच्या जागेतून) तेल, तूप, दुधाचे काढे इ. वातनाशक औषधी देणे होय.गुदातून(संडासच्या जागेतून) दिलेले औषधे बस्ती उपचाराने कमी काळात, अधिक कार्याक्षमतेने वात कमी करणाऱ्या आणि हाडांची निर्मिती करणाऱ्या भागापर्यंत पोहचवले जाते.यातूनच वाताचा आजार तसेच इतर आजार सुध्दा कमी होतात.

वाताच्या विकारासाठी विशेष पंचकर्म उपचार :-
  •     बस्ती उपचार(इनेमा) :-या उपचाराने मणक्याचे गॅप, संधिवात, पॅरालिसिस, हाडांची झीज भरून काढणे व इतर वाताच्या आजारात उपयोगी.
  •     पाठ बांधणे : पाठदुखी व मणक्याची झीज यासाठी पाठ बांधणे उपचार.
  •     रक्तमोक्षण : ठणकणाऱ्या भागातून रक्त काढणे.
यासाठी अभ्यंतर औषधे घेणे, बस्ती, वामन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य, विविध प्रकारचे लेप अशा माध्यमातून चिकित्सा घेतल्यास संधिवात विषयक तक्रारीपासून मुक्तता मिळू शकते.
- डॉ.सुमित साळुंखे.(आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय
भिलवडी
संपर्क:9822974748/9975913292



संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909