आयुर्वेदामध्ये मुलांसाठी 16 संस्कार वर्णन केले आहेत.यापैकी सुवर्ण प्राशन संस्कार हा एक आहे.

काय आहे सुवर्णप्राशन ?
       शुद्ध सुवर्णआयुर्वेदिक औषधाबरोबर मध व तूप असमान मात्रेत घेऊन मुलांना चाटवणे.
      0 ते 14वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना सुवर्ण प्राशन संस्कार करता येते.
      वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांच्या बुद्धीचा 90 टक्के विकास होत असतो या काळात याचा विशेष उपयोग करून घेता येतो.

सुवर्णप्राशन फायदे

सुवर्णप्राशन हि एतत मेधाग्निवर्धनम् |
आयुष्य मंगलम् पुण्यम्  वृष्यम् ग्रहापाहम ||
मासात् परममेधावी व्याधीर्भिर्न च धृष्यते |
षड्भिर्मासे श्रुतधरः सुवर्णप्राशनात् भवेत्||                              
                    काश्यपसंहिता

 1. सुवर्णप्राशनाने मुलांची बुद्धी, अग्नी म्हणजे पचनशक्ती व शारीरिक व मानसिक सुद्धा बल वाढते.
2.मुलांची प्रतिकारशक्ती वाढवून वरचेवर आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
3.
 धी म्हणजे आकलन शक्ती एखादी गोष्ट पटकन समजणे.
धृती म्हणजे धारण शक्ती 
   एखादी गोष्ट दीर्घ काळ लक्षात ठेवणे.
स्मृती -स्मरणशक्ती योग्य वेळी योग्य गोष्ट आठवणे.
     या तिन्हीची मिळून बुद्धी बनत असते, म्हणून सुवर्ण प्राशन उपयुक्त आहे.
4) डोळ्यात एक प्रकारची तेजस्विता व चमक आणण्यास उपयुक्त.
5) वयानुसार संपूर्ण विकास होण्यास उपयुक्त.
6) वयानुसार न बोलणं,चोचरेपणा मंद हालचाली यामध्ये उपयुक्त.

 कधी करावा ?
    प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर ती हा संस्कार करतात.

पुष्यच का ? 
      या दिवशी चंद्र हा खूप बलवान असतो.सर्व औषधी वनस्पतींना जे अमृतत्व मिळत ते चंद्राच्या प्रकाशात मिळत असते त्यामुळे त्या दिवशी औषधे अधिक कार्यक्षम बलवान असतात.
       आपल्या मुलांना नवीन कपडे,महागडी खेळणी आपण देतच असतो, याचबरोबर सर्वांगीण विकासासाठी सुवर्ण मार्ग असणार सुवर्ण प्राशन संस्कार करायला काहीच हरकत नसावी.

अधिक माहितीसाठी संपर्क :-
 डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य) 
श्री विश्वहंस आयुर्वेद व पंचकर्म योग चिकित्सालय भिलवडी जि. सांगली
मो. नं.9822974748










संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909