II ॐ II श्री ll 卐 II

आयुर्वेदाचार्य डॉ.सुमित साळुंखे १३ वर्षाहून अधिक काळ आयुर्वेद उपचार ,प्रसार व संशोधनात कार्यरत आहेत.आयुर्वेदाच्या सहाय्याने सुदृढ आरोग्य सेवा देण्याचे कार्य उत्तमरीतीने सुरु आहे.सांगली व परिसरात ख्यातनाम आयुर्वेदाचार्य म्हणून परिचित असलेले डॉक्टर सामाजिक कार्यात तितकेच सक्रीय असून निरोगी समाजासाठी ते प्रयत्नशील आहेत.
       आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.
        गौतम बुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते.

डॉ.सुमित रघुनाथ साळुंखे  आयुर्वेदाचार्य (BAMS) |   REG NO : I-59199A1
संस्थापक - महाआयुर्वेद 
वैद्यकीय शिक्षण -  भारती आयुर्वेद महाविद्यालय,पुणे.
आयुर्वेदाचार्य - श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय ,भिलवडी.
संस्थापक - श्री विश्वहंस आयुर्वेद फौंडेशन & रिसर्च सेंटर ,भिलवडी.
अध्यक्ष-नॅशनल आयुर्वेद स्टुडंट युथ असोसिएशन,सांगली.(NASYA)
सदस्य – आयुर्वेद पंचकर्म प्रक्टिसनर्स असोसिएशन (APPA)
सदस्य-National Integrated Medical Association (NIMA)साधक  श्री विश्वपंढरी
शिक्षण तज्ञ – शालेय शिक्षण समन्वय समिती ,जि.प.शाळा.धनगाव (२०१४-१६ ).
शिबीर प्रमुख (प्रमुख चिकित्सक) – विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट संचालित आयुर्वेदिक शिबीर ,नृसिंहवाडी.(दर पौर्णिमेस सेवाभावी आयुर्वेद उपचार शिबीर)

सांगली जिल्हा संपर्क प्रमुख -  विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट,कोल्हापूर.

संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909