ll महाआयुर्वेद - निरोगी जीवन अविरत ll -
स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम् |आतुरस्य व्याधिपरिमोक्ष|| (च. सु.)
स्वस्थ व्यक्तींच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आजाराने ग्रस्त अशा रुग्णांना आजार मुक्त करणे असे अनमोल प्रयोजन असणारा वेद म्हणजे आयुर्वेद. निरोगी आयुष्य जगण्यासाठी आयुर्वेदाचे ज्ञान असणे आज एकविसाव्या शतकात काळाची गरज बनली आहे.
आयुर्वेदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला आपल्या महाराष्ट्राला जगभरातील लोकांना व्हावा या उदात्त हेतूने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत आम्ही "महाआयुर्वेद - निरोगी जीवन अविरत" या डिजिटल व्यासपीठाची निर्मिती करीत आहोत.
या व्यासपीठाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील आयुर्वेदाचा वापर त्याचे महत्त्व उपचार पद्धती विषयी मार्गदर्शन वैयक्तिक प्रश्न व शंकांचे समाधान करण्यासाठी आम्ही कार्यरत असणार आहोत.
या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही आपले व कुटुंबाचे आरोग्य जास्तीत जास्त निरोगी राखण्यासाठी प्रयत्नशील राहूया.महाआयुर्वेद या व्यासपीठाची माहिती जास्तीत जास्त जनसामान्यांपर्यंत पोहचवून आपणही या प्रवासामध्ये आपलं योगदान द्याल हि अपेक्षा.
आपले मनःपूर्वक धन्यवाद..!
- टीम महाआयुर्वेद
SHARE THIS ARTICLE |
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909