डॉ . सुमित साळुंखे ग्लोरीऑफ आयुर्वेदा एक्सलन्स अवॉर्ड2026 पुरस्कारने सन्मानीत .
: प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
दैनिक भास्कर समूह व माय एफ एम मार्फत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते ग्लोरीऑफ आयुर्वेदा एक्सलन्स अवॉर्ड 2026 पुरस्कार देऊन डॉ. सुमित साळुंखे यांना सन्मानित करण्यात आले . रेडिओच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच निर्वाण क्रूज पणजी गोवा या ठिकाणी कार्यक्रम पार पडला.
श्री सद्गुरु आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांचे ते अनुग्रहित आहेत .सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली रुकडीकर दिंडी चे ते यशस्वी मार्गदर्शन व यशस्वी नियोजन करतात. आषाढी वारीमध्ये आयुर्वेद शिबिरांचे आयोजन करतात. तसेच शाळांमध्ये मुलांना 'संस्कार ,आयुर्वेद व पंचकर्म' याविषयी मार्गदर्शन करतात. हे दरवर्षी चालू राहते. तसेच श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सेवाभावी आयुर्वेद उपचार शिबिर दर पौर्णिमेस होत असते. त्या ठिकाणी 300 पेक्षाही अधिक रुग्णांना मोफत तपासणी व औषध उपचार केले जातात. त्या ठिकाणी डॉक्टर सुमित साळुंखे
' शिबिर प्रमुख' म्हणून कार्यरत आहेत.
वैद्य सुमित साळुंखे यांनी 2009- 2010 मध्ये भारती आयुर्वेद महाविद्यालय पुणे, येथे 'आयुर्वेदाचार्य' ही पदवी प्राप्त केली. आयुर्वेदाचे शिक्षण वैद्य. समीर जमदग्नी सर व वैद्य. अनिल बनसोडे सर यांच्याकडे घेतले .प्रथम पासूनच आयुर्वेद चिकित्सेवरती नितांत प्रेम व श्रद्धा असल्याने ऍलोपॅथी प्रॅक्टिस कडे न वळता आयुर्वेद प्रॅक्टिस करायची यावर ते ठाम होते .
16 वर्षांपूर्वी आयुर्वेद प्रॅक्टिस शहरांमध्ये चांगली विकसित होत होती. परंतु खेडेगावांमध्ये आयुर्वेद प्रॅक्टिस फारसी रुचत नव्हती. असे असतानाही डॉ.सुमित साळुंखे यांनी भिलवडी मध्ये प्रॅक्टिस सुरू केली. आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची नाही तर प्रथम आयुर्वेद विषयी जागृती, प्रचार अन प्रसार करायचा आहे यांची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. त्या दृष्टीने त्यांनी मोठ्या जिद्दीने प्रयत्न केले.श्री विश्वहंस चिकित्सालय आणि आयुर्वेद हे समीकरण भिलवडी परिसरात पंधरा वर्षात निर्माण करण्यामध्ये डॉक्टर सुमित साळुंखे यशस्वी झालेले आहेत.महाराष्ट्रात ग्रामीण भागातील यशस्वी आयुर्वेदाचार्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते
डॉ. सुमित साळुंखे यांनी शास्त्रशुद्ध उपचाराबरोबर नाडी परीक्षणाद्वारे तपासणी करून औषधी चिकित्सा पथ्य व पंचकर्म या त्रिसूत्री द्वारे रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ सुमित साळुंखे यांनी 5000 पेक्षाही अधिक पंचकर्म केली आहेत. तसेच वीस हजार पेक्षाही अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले केले आहेत.
डॉसुमित साळुंखे हे सामाजिक कार्यात ही अग्रेसर आहेत. डॉ.सुमित यांचे विविध वृत्तपत्रे मासिके साप्ताहिक आयुर्वेदिक विषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत .शाळा,महाविद्यालय येथील व्याख्यानमाला मध्ये 'आयुर्वेद व पंचकर्म' याविषयी 300 पेक्षाही अधिक व्याख्यान महाराष्ट्रात झालेली आहेत. ही सर्व व्याख्याने निशुल्क त्यांनी केलेली आहेत. तसेच नॅशनल इंटरनॅशनल आयुर्वेद सेमिनार मध्ये आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. कोविड महामारी मध्ये डॉ सुमित साळुंखे यांनी पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, बँक कर्मचारी त्याचबरोबर एस टी आगार या ठिकाणी जाऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे औषध देऊन अनेकांना कोविडच्या महामारीपासून वाचवले आहे . तसेच अनेक रुग्णही त्यांच्या चिकित्सेमुळे कोविड सारख्या आजारातून मुक्त झाले आहेत
यामुळे त्यांनी अनेक पुरस्काराने सन्मानीत केले आहे यामध्ये .
हेल्थ आयकॉन अवॉर्ड (२०२२)महाराष्ट्राचे महामयम राज्यपाल भगतसिंग जी कोशारी यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
तसेच दैनिक भास्कर भास्कर समूह,My FM 104 तर्फे 2025 मध्ये 'रायझिंग स्टार ऑफ आयुर्वेदा'पुरस्कार त्यांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेआहे.
2020 मध्ये सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टमार्फत कोविड योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
दैनिक पुढारी माध्यम समूहाचा युवा आयकॉन अवॉर्ड 2025 .. देऊन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथे डॉ.सुमित साळुंखे यांना सन्मानित करण्यात आले.
2019 मध्ये डॉक्टर सुमित साळुंखे यांचे महापुरामध्ये पूर्ण आयुर्वेद क्लिनिक बुडाले होते. त्यातही त्यांनी त्यांनी स्वतः सावरून मोठ्या हिमतीने क्लिनिक पूर्ववत करून प्रॅक्टिस करत आहेत. तरीही भिलवडी सारख्या ग्रामीण भागाची नाळ त्यांची तुटली नाही.
आजही गेली सोळा वर्षापासून भिलवडी(ग्रामपंचायत असणाऱ्या गावात) सारख्या ग्रामीण भागामध्ये आयुर्वेदाची यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत . आयुर्वेद प्रॅक्टिस ही फक्त शहरांमध्येच यशस्वी होऊ शकते या समजूतीला फाटा देत सर्व जनसामान्यांना 'आपला आयुर्वेद हा आपल्यासाठीच आहे' ही भावना निर्माण करून माफक खर्चामध्ये आरोग्यसेवा देण्याचे काम डॉक्टर सुमित साळुंखे यांनी केलेले आहे.
हे नवीन आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना यशस्वी आयुर्वेद प्रॅक्टिस करण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909
