रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आयुर्वेद परिभाषेत व्याधीक्षमत्व असे म्हणतात.
व्याधीक्षमत्व(चक्रपाणी) सुंदर श्लोकात वर्णन केले आहे
व्याधीक्षमत्व व्याधीबलविरोधत्व
व्याधीउत्पाद प्रतिबंधत्व इतियावत ||
व्याधींबालविरोधत्व : व्याधीबलाच्या विरोधात बल उत्पन्न करणे.
व्याधीउत्पाद प्रतिबंधत्व : व्याधीउत्पन्न व्हायला प्रतिबंध करणे
रोगप्रतिकारक शक्ती कोणाची कमी आहे जाणून घेऊया
1) जास्त जाड
2) जास्त बारीक
3) ज्याचा आहार कमी
4)ज्याचे सत्व कमी आहे(मानसिक बल)
5) ज्यांचा आहार विहार चुकीचा आहे
बाहेरील खाणे,फास्टफूड, बेकरी पदार्थ आदी
6)जे आजाराने ग्रस्त असतात.
मधुमेह, रक्तदाब, नियमित आजारी असणारे लोक
अशा लोकांनी प्रकृतीनुसार आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्य ना भेटून आपल्या आहार विहाराचे नियोजन करावे. व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद तज्ञा कडून आयुर्वेदिक औषधे घ्यावीत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवयाची असेल तर आहार विहार विषयाची थोडक्यात माहिती घेऊया
1) रोज सकाळी नियमित सूर्यनमस्कार,चालणे व प्राणायाम करावेत
2)रोज 2 वेळा सात्विक षडरसात्मक आहार घ्यावा.एखाद्याची पित्त प्रकृती असेल तर 3 वेळा आहार घेतला तरी चालेल
3)भूक लागल्यावर जेवण करणे व तहान लागल्यावर पाणी पिणे हा सर्व साधारण नियम पाळावा
काय खावू नये:
थंड पदार्थ, फास्टफूड, बेकरी पदार्थ,शिळे अन्न,आंबवलेले पदार्थ टाळावेत
विरुद्ध अन्न.. दूध भात, दूध व फळे एकत्र खाणे टाळावे
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद जीवनशैली चा स्वीकार करावा.आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्याचा सल्ला घ्यावा.
डॉ सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय
भिलवडी, जि. सांगली
संपर्क:9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909