STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

सोरियासिस आहे...घाबरलाय? -नक्की वाचा



सोरियासिस झाला आहे असं म्हटलं तरी सर्व सामान्यांच्या अंगावर काटा उभा राहतो.अशा वेळी सोरियासिस म्हणजे काय?हे जाणून घेणे आवश्यक आहे,घाबरण्याचे मुळीच कारण नाही.सोरियासिस म्हणजे त्वचाविकार.आयुर्वेद शास्त्रामध्ये 18 प्रकार वर्णन केले आहेत.
    त्वचाविकार कशामुळे उत्पन्न होतो याची प्रमुख कारणे

1)विरुद्ध आहार सेवन(शिकरण,दूधभात)
2)अतिप्रमाणात तिखट, तेलकट,खारट तसेच बेकरीचे पदार्थ खाणे
3) हॉटेलिंग आंबवलेले पदार्थ,दूषित मांसाहार
4)दही,लोणचे,हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे
5)भूक लागली नसताना सुद्धा खाणे

असे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पाचक अग्नीवर ताण येतो.
    जो आहार आपण शरीराच्या चांगल्या उपयोगासाठी घेतला त्याचे रूपांतर योग्य रसयुक्त धातू मध्ये न होता अपक्व दोषपुर्ण आहाररस तयार होतो याला आयुर्वेदात 'आमदोष' असे म्हणतात.हा आमदोष रक्तात मिसळल्याने रक्त अशुद्ध होते.त्यामुळे त्वचारोग निर्माण होतो.

1) सोरियासिस
2)इसब
3)जळवात(हात पायाला भेगा पडणे)
4)अंगावर गांधी उठने
5)सर्व अंगाला खाज सुटणे
6)नायटा
7)एक्सिमा
8)त्वचेवरील पांढरे डाग
9)लाल रंगाचे पुरळ उठणे
10)नागीण

अशा प्रकारे वेगवेगळे त्वचाविकार निर्माण होतात.
    यासाठी आयुर्वेद अभ्यंतर चिकित्सा,पथ्यपालन व पंचकर्मातील वमन, विरेचन व रक्तमोक्षण या चिकित्सेच्या माध्यमातून त्वचविकारावर मुक्तता मिळवू शकतो.

डॉ. सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
भिलवडी जि. सांगली
मोबा 9822974748








संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909