STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

प्रयत्न करताय...बाळ हवंय ? - नक्की वाचा


'आई होणे' हा प्रत्येक स्त्रीचा सुखद क्षण  असतो. लग्नानंतर नवीन नवलाई चे सुरुवातीचे दिवस संपले की दोघांनाही अजून एक छोटा पाहुणा-पाहुणी घरी यावी त्यांच्यामुळे सारे घर पुन्हां एकदा आनंदाने भरावे असे वाटत असते.असे आनंदाचे क्षण काही जण अनुभवतातही.परंतु काही जोडप्यांना हा आनंद हवा-हवासा वाटत असुनही, तो अनुभवता येत नाही.रुग्णालयाच्या फेऱ्या चालू होतात.अशा निराश झालेल्या जोडप्यांना डॉ सुमित साळुंखे  यांचे श्री विश्वहंस आयुर्वेद उपचार फलदायी ठरत आहेत.

      मूल न होणे यास 'वंध्यत्व'असे म्हणतात.प्राचीन व यशस्वी उपचार आयुर्वेदातच आहेत.मूल होण्यासाठी स्त्री व पुरुष असे दोघेही शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणे गरजेचे आहे.त्यामुळे उपचार करताना दोघांवर ही उपचार करणे आवश्यक असते.वंध्यत्वाच्या कारणांचा विचार करता 

पुरुषांमधील कारणे
1)शुक्रबीज कमी मात्रेत तयार होणे
2)शुक्रबीज कार्यक्षमता कमी असणे
3)उष्णता
4)दौर्बल्य
5)लठपणा

स्त्रीया मधील कारणे
1)मासिक पाळीच्या तक्रारी
2)बीजदोष-बीज तयार न होणे,बीज न       फुटणे
3)बीजवाहिन्यातील अडथळे(tubal block)
4)गर्भाशय ग्रंथी(fibroid)
5)वारंवार होणार गर्भस्राव
6)लठ्ठपणा
7)दौर्बल्य

आयुर्वेदात प्रत्येक कारणानुसार औषधी, पथ्य व पंचकर्म चिकित्सा उपयुक्त ठरते.
    औषधी चिकिस्तेत स्त्री मध्ये मासिक पाळी नियमित करून बीज दोषा चा विचार केला जातो. गर्भधारणेसाठी बीज सक्षम करून स्त्री बीज फुटण्यासाठी(ovulation) प्रयत्न केले जातात.पुरुषा मध्ये त्यांच्या शरीरातील उष्णता कमी करून शुक्र दोष दूर केले जातात.या सर्वांमध्ये औषधी आयुर्वेद चिकिस्तेबरोबर पंचकर्माचे ही मोलाचे योगदान आहे.

     'शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी'

 त्याप्रमाणे शरीराला गर्भधारणेस सक्षम बनवण्यास पंचकर्माने शुद्ध करावे लागते.दोघांनाही बस्ती ,विरेचन,शिरोधारा या पंचकर्मचा वापर फक्त शरीर शुद्धि साठी केला जातो.'शिरोधारेने 'मानसिक स्वास्थ लाभते. स्त्रीयांसाठी 'उत्तर बस्ती'चा उपयोग गर्भाशयातील दोष दूर करण्यासाठी व 'tubal block' ही दूर होतात.
   अशा प्रकारे अनेक जोडप्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम आयुर्वेद व पंचकर्मच्या उपचाराने करता येईल.जीवनातील अपत्यसुखाचे  क्षण प्रत्यक्ष अनुभवता येतील..!

डॉ सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
भिलवडी, जि. सांगली
मोबा 9822974748



संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909