केसांची चिंता वाटतेय ? सुंदर व निरोगी केसांसाठी - नक्की वाचा - नक्की
आपले केस निरोगी व सुंदर दिसावेत असे प्रत्येकाला वाटत असते.केसाच्या तक्रारी सुद्धा वेगवेगळ्या असतात.प्रत्येकवेळी तक्रारीचे स्वरूप जरी सारखे असले तरी कारणे वेगवेगळी असतात.
केसाच्या तक्रारी :
केस गळणे,पांढरे होणे,चाई पडणे,कोंडा होणें, टक्कल पडणे,केस खूप कोरडे होणे,केस मध्येच तुटणे,केसांना तेलकटपणा येणे अशा वेगवेगळ्या स्वरूपात तक्रारी असतात.आयुर्वेदामध्ये केसांसाठी केश व रोम अशा दोन संज्ञा आहेत. केश म्हणजे डोक्यावरील केश व रोम म्हणजे शरीरावरील केस. साधारणतः वात प्रकृतीचे केस रुक्ष,पित्त प्रकृतीचे विरळ व कफ प्रकृती चे केस दाट व काळेभोर असतात.
हेतू / कारणे
मनुष्याच्या आहार विहारातच केसाच्या तक्रारीची कारणे लपलेली असतात.आंबट,खारट,जास्त तिखट,बेकरी प्रोडक्ट्स,मांसाहार, भेळ, पाणीपुरी,आंबवलेले पदार्थ, चटपटीत पदार्थ अति प्रमाणात सेवन केल्याने केसाच्या समस्या निर्माण होतात.कॉलेज च्या तरुण तरुणी मध्ये केसांच्या तक्रारी या कारणामुळे आढळत आहेत.गरोदर स्त्री ने अधिक प्रमाणात जर लवण रस(,खारट आदि) सेवन केला तर बालकास केस गळणे,पिकणे या तक्रारी उद्भवतात.केस हा अस्थी धातूचा मल आहे.calcium कमी असणाऱ्या लोकांमध्ये सुध्दा केसांच्या तक्रारी उदभवतात.
चिकित्सा
आयुर्वेद चिकित्सा हाच उत्तम पर्याय आहे.आयुर्वेद चिकिस्ता करताना पित्त शमन,अस्थीधातूला बल देणारी,रक्तप्रसादन करणारी औषध वापरली जातात
पंचकर्म
1) विरेचन-हे पंचकर्म पित्ताचे शमन करून केसांचे विकार आटोक्यात आणते
2) नस्य- नाकात औषधी सिद्ध तेल, तूप चे थेंब टाकतात
आहारात दूध,तूप व रसायन औषधी घेणे व केसांची निगा राखणे आवश्यक आहे.केसांना नियमित तेल लावणे.आयुर्वेद चिकित्सा घेत असताना आयुर्वेद तज्ञा चा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीकरिता
डॉ. सुमित साळुंखे
आयुर्वेदाचार्य (भिलवडी)
मोबा 9822974748.
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909