गणपतीला दुर्वा का वाहतात?
गणांचा अधिपती गणपती.हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व कार्यांच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीला दुर्वाची जोडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत. 21 दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते.
गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषीमुनी आणि देवता यांना आनलासुर नावाचा राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली. अनल अर्थात अग्नीदेवतांच्या विनंती नंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुलींनी प्रत्येक 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जोड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषी नी दुर्वाची 21 जुडी गणेशाला खाण्यास दिली त्यावेळी अथक प्रयत्नानंतर गणेशाच्या पोटात न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी गणपतीने सांगितले यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजार यज्ञ व ते दान व तीर्थ यात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे गणराया म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
दूर्वा ही एक महाऔषधी वनस्पती आहे. मानसिक शांतीसाठी ही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णावर ही दुर्वा लाभप्रद असल्याचे आयुर्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे.
दूर्वा पित्त शामक आहे. त्याचबरोबर दाह कमी करते, बुद्धीवर्धक आहे, जुलाब, उलटी, नाकातून दातातून कानातून रक्त येणे तसेच पाळीच्या तक्रारीवर ही दुर्वा अमृता समान काम करते. बाळंतपणात गर्भाशयाची ताकद वाढवते व गर्भाचे चांगले पोषण करते.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय भिलवडी. जि. सांगली
मो. नं.9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909