रक्तमोक्षण
पंचकर्म पैकी रक्तमोक्षण हे पाचवे कर्म आहे मोक्षण म्हणजे त्याग करणे, सांडणे किंवा वाहविने.
"रक्तमोक्षण म्हणजे शरीरात तयार होणाऱ्या खराब रक्ताला शरीराबाहेर काढणे होय".
रक्तमोक्षणच्या दोन प्रमुख पद्धती आहेत.
1) स्थानिक रक्तमोक्षण :- जळू, अलाबु, शृंग, घटियंत्र, प्रच्छान यांच्या साहाय्याने केले जाते.
2) सार्वदेहिक रक्तमोक्षण :- शास्त्रोक्त पद्धतीने शिरेवाटे केले जाते.
रक्त दूषित होण्याची कारणे
दही, गूळ, फरसाणा, इडली, वडा, उत्ताप्पा, समोसे यांचा अतिप्रमाणात वापर आहारात केल्याने तसेच आंबट- खारट पदार्थाचा अतिप्रमाणात वापर केल्यास परिणामी शरीरात रक्तदृष्टी होते.
दूषित पाण्यामुळे रक्तामुळे होणारे विकार
त्वचा विकार, डोके दुखी, यकृताचे विकार, वांग मुखदोषिका, वातविकार, पित्ताच्या गांधी उटणे आदी विकार दूषित रक्तामुळे होतात. अशा विकारांमध्ये जळू लावून आपणास रक्तमोक्षण करता येते.
वातरक्त, गुडघे दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, मान दुखी या शिरांच्या ठिकाणी रक्तदूषित असते त्या ठिकाणीं जळू लावून दूषित रक्त बाहेर काढले जाते. त्यामुळे अशा वातविकारामध्ये रक्तमोक्षण चा चांगला फायदा होतो.
त्वचा विकार, त्वचेच्या ठिकाणी खाजविणे, शीतपित्त, चाई पडणे अशा ठिकाणी रक्त दूषित असते त्या ठिकाणी जळू लावून दूषित रक्त बाहेर काढता येते व रुग्णाला उत्तम फायदा होतो.
अशा प्रकारे सर्व पथ्य व नियम पाळून केलेलें रक्तमोक्षण उत्तम स्वास्थ्य देईल यात शंकाच नाही.
अधीक माहिती साठी संपर्क
डॉ सुमित साळुंखे (आयुवेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय
भिलवडी, जि. सांगली
मोबा.9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909