STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

गुडघेदुखी, हृदय विकारांवर बस्ती पंचकर्म उत्तम पर्याय..!


पंचकर्मातील बस्ती हा शब्द अनेकांच्या परिचयाचा आहे मागील लेखातून बस्ती पंचकर्माची माहिती घेतली या लेखात आपण बस्तीच्या उपप्रकाराविषयी माहिती घेवूया...!


1) जानुबस्ती :- 
गुडघ्या भोवती पिठाचे पाळे करून त्यात औषधी सिद्ध तेल भरणे म्हणजे जानूबस्ती होय.

# उपयोग#

गुडघ्याची व हाडाची झीज होण्याच प्रमाण कमी होत, गुडघ्यातील कुर्चेचे झीज होणे कमी येत,गुडघा सुजणे, गुडघा दुखणे या सर्व आजारासाठी जानूबस्ती दिला जातो.


2) कटीबस्ती :-
 कंबरेला पिठाचे पाळे करून औषध सिद्ध द्रव्य भरणे म्हणजे कटीबस्ती होय.

#उपयोग#

कंबरेच्या हाडामध्ये झीज होणे, कंबरेच हाड सरकणे, दोन मणक्यामधील गादी म्हणजे खुर्च्या सरकणे, कंबर आखडणे यामध्ये कटीबस्तीचा चांगला उपयोग होतो.




3) हृदबस्ती

:- हृदयाच्या ठिकाणी औषध सिद्ध पिठाचे पाळे करून कोमट औषध द्रव्ये 15 मिनिटापर्यंत धारण करणे म्हणजे हृदबस्ती होय.

#उपयोग#

हृदयाच्या ठिकाणी वेदना असणे, हृदयाची गती अनियमित असणे, हृदय धडधडणे, तसेच हृदयाची रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असणं यामध्ये हृदबस्तीचा चांगला फायदा होतो.


4) नेत्र बस्ती :-
 डोळ्याभोवती पाळे करून कोमट औषधी सिद्ध द्रव्य डोळ्याच्या ठिकाणी धारण करणे यास नेत्र बस्ती असे म्हणतात.

#उपयोग#

तिरळेपणा, एक डोळा बारीक असणे अशा डोळ्याच्या विकारासाठी नेत्र बस्तीचा उपयोग केला जातो.

5) व्रण बस्ती :- 
जखमांच्या ठिकाणी कॅथ्याटर आणि सिरींज याच्या साहाय्याने आत व्रणात (जखमच्या ठिकाणी) याला व्रण बस्ती असे म्हणतात.

#उपयोग#

हाडातील जखमा ,न भरून येणाऱ्या जखमा, भंगदर (fistilu) यामध्ये व्रण बस्तीचा चांगला उपयोग होतो.


6) शिरोबस्ती :
शिरोबस्तीमध्ये डोक्यावर चामड्याची पिशवी लावून उडदाचे पीठ लावले जाते व औषधी सिद्ध द्रव्य सोडली जातात, त्यास शिरोधारा असे म्हणतात.

#उपयोग#

निद्रानाश, निर्णय शक्ती कमी असणे, मानसिक विकार, विस्मरण, चंचलता यासारख्या आजारामध्ये शिरोबस्तीचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो.

7) उत्तरबस्ती :
उत्तर मार्ग म्हणजे स्त्रियाच्या बाबतीत गर्भाशयात बस्ती दिला जातो तसेच मूत्र मार्गाद्वारे बस्ती दिला जातो त्यास उत्तरबस्ती असे म्हणतात

#उपयोग#

गर्भाशय लहान असते, गर्भाशयातील आतील स्तराला सूज असणे, गर्भाशयात ब्लॉक असणे, मूल न होणे आदी आजारामध्ये उत्तर बस्तीचा चांगला फायदा होतो. तसेच मूत्र मार्गाच्या तक्रारारीत चांगला फायदा होतो.
अशा प्रकारे वेगवेगळे बस्ती वेगवेगळ्या आजारासाठी वापरली जातात ही सर्व पंचकर्म आयुर्वेदाचार्याच्या देखरेखी खाली करणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय
भिलवडी, जि सांगली
मोबा 9822974748








संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909