गणपतीला मोदक का आवडतो?
असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचे मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं..!
देवी देवतांच्या मांदियाळीत आहार प्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्री गणेशाचे रूप आपल्याला नेहमीच भावतं आणि त्यासाठी बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत 21 मोदकाच्या नैवेद्याचे ताट सजत.
असा हा गणरायालाच नव्हे तर आबाल वृद्धांना प्रिय मोदक सगळ्यांनाच आवडू लागला.
मोदक प्रिय असल्यामागे गोष्ट अशी आहे की 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला गणपतीशी परशुरामाने युद्ध पुकारले, या युद्धात गणरायाचा एक दात तुटला होता.त्यामुळे बाप्पाला दात तुटल्याने काही खाणे त्रासदायक होत असताना लाडक्या गणरायाला खास पदार्थ तयार करण्यात आला. हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ होता. 'मोदक' म्हणजे सहजपणे तोंडात मिसळून जात हा पदार्थ खाताना त्रास होत नाही तर पदार्थाची गोडी वेगळीच चव देते. त्यामुळे गणपतीला मोदक अधिक पसंत असल्याचे मानले जाते.
"मोदक म्हणजे आनंद"...
मोद म्हणजे आनंद देणारे मोदक खाल्ल्याने मन प्रसन्न होते गणपती बाप्पा नेहमी आनंदी राहणारा देव आहे तसेच मोदक शुद्ध पीठ ,तूप ,मैदा ,खवा ,गूळ आणि नारळापासून तयार केला जातो.त्यामुळे मोदक आरोग्यासाठी ही गुणकारी असल्याचे मानले जाते,हा पदार्थ अमृततुल्य मानला जातो. मोदक खाल्ल्यावर गणेशाला अपार संतुष्टी मिळाली. तेव्हापासून गणपतीला मोदक अधिक प्रिय आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क
डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
भिलवडी जि. सांगली
मो. नं. 9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909