STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

पाठीच्या मणक्याच्या विकारावर बस्ती पंचकर्म श्रेष्ठ..!

बस्ती


बस्ती म्हणजे काय?

जसे आपण तोंडावाटे औषध घेतो तसेच गुदद्वारामार्ग औषध देणे म्हणजे बस्ती होय. आजकालच्या व्यवहारिक भाषेत समजवण्यासाठी म्हणून इनिमा हा शब्द वापरला जातो. सध्याच्या परिस्थितीत बस्ती करण्यासाठी इनिमा पॉट ,गिल्सरिन सिरीज, रबरी कॅथ्याटर या गोष्टी वापरल्या जातात.
स्नेहन स्वेदन करून बस्ती कर्म केले जाते
बस्तीचे अनेक प्रकार ग्रंथात वर्णन केलेले आहेत.



बस्ती :-
 विविध औषधी सिद्ध तेल, काढा, दूध, चुन्याची निवळी,दिव्यजल याचा उपयोग करून गुदद्वारामार्ग औषध देणे म्हणजे बस्ती होय. गुदातून (संडासच्या जागेतून) दिलेले औषध बस्ती उपचाराने कमी काळात अधिक कार्य क्षमतेने वात कमी करणाऱ्या आणि हाडाची निर्मिती करणाऱ्या भागापर्यंत पोहचविले जाते. यातूनच वाताचे आजार तसेच इतर आजार ही कमी होतात. चरकाचार्यानी बस्तीच्या संख्येचे तीन प्रकार केलें आहेत.वाग्भट चार्य नी हेच प्रकार सांगितले आहेत.

1) कर्म बस्ती :- 30
2) काल बस्ती :-15
3) योग बस्ती :- 08

आयुर्वेदाचार्य रुग्णाच्या प्रकृती किंवा आजारानुसार 8,15,30 बस्ती देण्याचे ठरवितात. म्हणून फक्त बस्ती दिल्यावरच रुग्ण अर्धा बरा होता.


# बस्तीचे उपयोग #

1) वाताचे आजार, कंबर दुखी, गुडघे दुखी, पाठीच्या मणक्याचे आजार, सांधे दुखी याच्यामध्ये चांगला उपयोग होतो.

2) स्त्रियांच्या मध्ये पाळीच्या तक्रारी, मूल न होणे, यामध्ये बस्तीचा फायदा होतो.

3) पुरुषांच्या मध्ये लैंगिक समस्या, शुक्राणूच्या तक्रारी मध्ये चांगला उपयोग होतो.

4) ज्याला शौचास होत नाही, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झालेली आहे, वजन कमी करण्यासाठी बस्तीचा खुप चांगला फायदा होतो.

5) स्वस्थ माणसांनी पावसाळ्यात बस्ती घेतल्यास म्हातारपण उशिरा येते व तारुण्य टिकून राहते.

पुढच्या लेखामध्ये बस्तीच्या उपप्रकारामध्ये माहिती जाणून घेऊया..!
पंचकर्माचे सर्व नियम व पथ्य पाळून तज्ञ आयुर्वेदाचार्याच्या सल्ल्याने बस्ती पंचकर्म करावे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय,भिलवडी,जि सांगली.
मोबा:9822974748











संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909