STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

अम्लपित्त व पोटाच्या तक्रारी वर पंचकर्म विरेचन प्रभावी

#विरेचन#


विरेचन या उपक्रमात शरीरातील बिघडलेले दोष जुलाबद्वारे गुदमार्गाद्वारे बाहेर काढले जाते, त्यास विरेचन असे म्हणतात.

#विरेचन प्रक्रिया#

कोणत्याही पंचकर्म चिकित्सेपुर्वी शरीराची पूर्व तयारी करणे गरजेचे असते. यात सर्वांगाला औषधी सिद्ध तेल लावणे व पोटात औषधी सिद्ध तूप दिले जाते. त्यामुळें शरीर आतून व बाहेरून स्निग्ध केलें जाते. हा दिलेला स्नेह पचुन शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोचविण्यासाठी सर्वांगाला स्वेदन (वाफ) केले जाते. या काळात आहार विहाराचे पालन करणे गरजेचे असते.वरील प्रकारे 3ते7 दिवस पूर्व तयारी केली जाते. सम्यक स्नेहनाची लक्षणे दिसल्यानंतर मग विरेचन दिले जाते. वमनात सांगितल्याप्रमाणे पुर्व कर्म व प्रधान कर्म केले जाते. नंतर विरेचनासाठी औषध दिले जाते.

# विरेचानासाठी औषधे#

विविध औषधांचे काढे, चुर्ण, गोळ्या व तेलाचा वापर केला जातो. वैद्य रुग्णाचे वय,बल, आजार व ऋतू याचा विचार करून औषधांची मात्रा ठरवितात जुलाबाचे औषध शरिरात गेल्यावर पचून रक्तात मिसळून आपल्या गुणांनी शरीरात वाढलेल्या दूषित पित्ताला आतड्यात आणते. या सर्व दोषाना संडास वाटे शरीराबाहेर टाकले जाते. योग्य विरेचन योगाने प्रथम मल मग पित्त नंतर कफ बाहेर टाकला जातो. शेवटी शेवटी चिकट पाणी व वात बाहेर टाकला जातो. विरेचन पुर्ण झाल्यावर मल प्रवृत्तीची भावना थांबते. सर्व शरीरात हलकेपणा व उत्साह जाणवतो.

#विरेचन पश्चात कर्म#

विरेचन पुर्ण थांबल्यावर थोडा वेळ विश्रांती घ्यावी. त्यानंतर 3ते7 दिवस संसर्जन कर्म पाळणे आवश्यक असते.



#विरेचन उपयुक्तता#

आम्लपित्त, उष्णतेचे विकार, त्वचा विकार, रक्ताशी संबंधित आजार, डोळ्यांचे आजार, यकृत व प्लिहाचे आजार, कृमि, गर्भाशयाचे आजार,पोटाच्या तक्रारी व वातविकार आणि निरोगी व्यक्तीसाठी शरद ऋतूत उत्तम फायदा होतो. अशा प्रकारे सर्व पथ्य व नियम पाळून तज्ञ आयुर्वेदाचार्याच्या देखरेखी खाली केलेले पंचकर्म विरेचन उत्तम स्वास्थ्य देईल यात काही शंका नाहीं.

अधिक माहिती करिता संपर्क
डॉ सुमित साळुंखे(आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय. भिलवडी, जि- सांगली.
मोबा.9822974748












संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909