STAY WITH US

श्री विश्वहंस आयुर्वेद - निरोगी आयुष्य अविरत..!

कफ विकारासाठी उपयुक्त पंचकर्म वमन..!

वमन


शरीर शुद्धी करणारी चिकित्सा म्हणजे पंचकर्म होय.बिघडलेले वात पित्त कफ हे दोष शरीराबाहेर टाकले जातात. शरीर शुद्धी करणारी पाच उपाय आहेत म्हणून त्यांना पंचकर्म असे म्हणतात.
वमन
पंचकर्मातील सर्वांत प्रथम कर्म म्हणजे वमन होय.
शरीरात साठलेल्या कफला उलटीच्या स्वरूपात बाहेर काढणे त्यास वमन असे म्हणतात.वमन तीन भागात केले जाते.
1)पुर्वकर्म
2)प्रधान कर्म
3)पश्चात कर्म

1)पूर्व कर्म:- हे वमन पूर्वी केले जाते. या मध्ये शरीरात पसरलेले दोष पोटात आणले जातात.पूर्वकर्मात स्नेहन व स्वेदन केले जाते.
A) स्नेहन
अभ्यंतर औषध सिद्ध तूप पोटातून खाण्यास दिले जाते.औषध सिद्ध तेल बाह्य अंगाला लावले जाते. जसे एखाद्या भांड्याला तूप लावल्यानंतर त्या भांड्याला काही चिकटत नाही त्या प्रमाणे शरीरात तूप दिल्याने किंवा पोटातून तूप घेतल्यावर दोष कुठेही चिटकत नाहीत.
B) स्वेदन
औषधी द्रव्यांची वाफ शरीराला दिली जाते.त्यामुळे मोकळ्या झालेल्या दोषांना पोटात आणले जाते.

2) प्रधान कर्म
3 ते 7 दिवसांची पूर्व तयारी झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार
सम्यक स्नेहनाची लक्षणे दिसल्यावर त्याला वमन चे औषध देऊन उलटी करवली जाते.दूध,ऊसाचा रस, जेष्ट मध चा काढा इ औषध सुखकर वमन साठी वापरले जाते.हे औषध घेतल्यावर 8 ते 10 उलट्या होतात.



#वमन उत्तम झाल्याची लक्षणे:-

इंद्रियांना प्रसन्नता येते,शरीर हलके वाटते व आजाराची लक्षणे कमी होतात.

3)पश्चात कर्म
यास संसर्जन कर्म असे म्हणतात.वमनानंतर रुग्णाला एकदम आहार देता येत नाही.कारण त्याचा अग्नी मंद झालेला असतो.त्यामुळे तो आहार पचवू शकत नाही.त्यामुळे रुग्णास लघु आहार दिला जातो.त्यामुळे जठर अग्नीचे वर्धन होते.

#वमना चे उपयोग:-

कफाचे आजार,जुनाट सर्दी,खोकला,दमा, त्वचेचे विकार,जाड व्यक्ती,मानसिक आजार तसेच अम्लपित मध्ये चांगला फायदा होतो.वसंत ऋतूत सर्वांनी वमन घ्यावे कारण सुर्यामुळे घट्ट झालेला कफ वितळत असतो,त्यामुळे कफाचे आजार वाढत असतात. वमनामुळे कफाचे आजार नाहीसे होतात.शरीर कांती वाढते. इंद्रिय प्रसन्न होतात व शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते.
वमन हे कर्म तज्ञ आयुर्वेदाचार्याच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे.अधिक माहिती साठी आपल्या जवळ च्या आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ.सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय भिलवडी
मोबा.9822974748.







संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909