शिरोधारा
पंचकर्मातील उपप्रकारामध्ये शिरोधारेचा समावेश केला जातो. प्राणवायु, मन या दोन महत्त्वाच्या अशा शरीर घटकांचा शिरांच्या ठिकाणी आश्रय आहे त्यामुळे शरीरासंबंधी करण्यात येणाऱ्या शिरोधारा व शिरोबस्ती या उपक्रमांना आयुर्वेद चिकित्सेत अतिशय महत्वाचे स्थान आहे.
शिरोधारा
डोक्याच्या मध्यभागी भुवयाच्या मध्ये तेल, ताक किंवा काढा यांची धार सोडली जाते, त्यास शिरोधारा असे म्हणतात.
आजच्या धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण जागरण स्पर्धा या सर्व हेतुमुळे शरीरात वाताची वृद्धी होते. अशा वेळी शिरोधारेचा वापर विकृत वाताला जिंकण्यासाठी बरेच करतात.
शिरोधारेचा उपयोग
मानसिक विकार, उन्माद, झोप न लागणे,अर्धित, रक्तदाब, जुनाट संधिवात, पक्षाघात, पोटाच्या तक्रारारी, उपासमार, उच्च रक्तदाब, स्त्रियांच्या पाळीच्या तक्रारारी आदी विकारात उत्तम फायदा होतो. तसेच इंद्रिये व मनाचे स्थैर्य वाढते, त्वचेची कांती सुधारते, केसांचे सौंदर्य सुधारते, बुद्धीमत्ता वाढते. शरीरातील उष्णता कमी होते व झोप व्यवस्थित येते.
तक्रधारा
शिरोधारेतील औषधी द्रव्याऐवजी ताकाचा उपयोग करून वरील पद्धतीनेच केलेल्या शिरोधारेस तक्रधारा असे म्हणतात.
तसेच सोरायसिस, हातापायांना भेगा पडणे, शरीरातील अतिरिक्त उष्णता, अरुंषिका (डोक्यातील खवडे) यासारख्या आदी आजारामध्ये तक्रधारा केली जाते.
सर्व प्रकारचे नियम व पथ्य पाळून वैद्याच्या देखरेखी खाली केल्या जाणाऱ्या शिरोधारे मध्ये उत्तम फायदा होतो.
अधिक माहितीसाठी संपर्क :- डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद व योग चिकित्सालय भिलवडी. जि. सांगली
मो.नं. 9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909