पाणी कसे प्यावे? कधी प्यावे?किती प्यावे...?
सकाळी पाणी प्यावे का ?
सकाळी पाणी पिणे हा खूप मोठा गैरसमज आहे. आयुर्वेदामध्ये सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचा उल्लेख जर तहान असेल तर एक ते दोन घोट पाणी पिण्याचा उल्लेख आला आहे. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास, एक तांब्या पाणी पिण्याची सवय चुकीची आहे. सकाळी उठल्यानंतर आपला जाठर अग्नी प्रदीप्त होत असतो. अशा वेळी सकाळी उठल्यावर पाणी पिण म्हणजे अग्नि विझविण्याचे काम होते. त्यामुळे भूक लागत नाही तसेच आपल्या शरीरातील पित्त दाबण्याचे काम करते. त्यामुळे अनेक आजार वाढू शकतात. सकाळी उठल्यावर पाणी पिणे यामुळे मधुमेह,कॅन्सर रक्तदाब,वंध्यत्व,संधिवात यासारखे आजार उत्पन्न होतात तसेच मध आणि कोमट पाणी याचा आयुर्वेदात कोठेही उल्लेख नाही. मध व कोमट पाणी पिणे विषासमान आहे.
निरोगी व्यक्तींनी शरद व ग्रीष्म ऋतूत पाणी भरपूर प्यावे. आयुर्वेदामध्ये अग्नी संस्कारीत (कोमट पाणी) प्यावे. तहान लागल्यावर पाणी प्यावे कारण पाण्याचे सुद्धा पचन व्हावे लागते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये, किडनी स्टोन असेल तर,जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.तो चुकीचा कारण जास्त पाणी पिल्यामुळे किडनी लोड घेते, त्यामुळे पाण्यातील क्षार किडनीत जास्त जाऊन अनेक क्षार तयार होतात. सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत हा लोकांचा फार मोठा गैरसमज आहे. पाणी पिण्याचा हा मलप्रवृत्तीशी संबंध नाही.
पाणी कधी प्यावे
अपचन असेल तर कोमट पाणी प्यावे. जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणे,हे अमृता समान आहे. जेवणानंतर लगेच खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे हे विषा सारखे आहे. जेवण झाल्यानंतर चार घोट पाणी प्यावे. त्यानंतर 45 मिनिटांनी जेवढी तहान असेल, तेवढे पाणी प्यावे. अन्नाचे पचन झाल्यानंतर पाणी पिणे हे शरीरासाठी बलदायक आहे. झोपताना पाणी पिणे त्याच्यामुळे सर्दी व डोकेदुखी सारखे रोग उत्पन्न होतात.
पाणी पिताना धने,ओवा, तुलसी पत्र यांनी पाणी संस्कारीत करून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते पाणी मडक्याचे भांडे,तांबे,पितळ तसेच काचेच्या ग्लास मधून प्यावे. रात्री तांब्याचा भांड्यात पाणी ठेवून सकाळी पिऊ नये.
आपल्या जवळच्या आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्याने पाणी कसे प्यावे याची माहिती घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
डॉ. सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद व पंचकर्म योग चिकित्सालय भिलवडी जि. सांगली
मो. नं.9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909