# नस्य #
पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी करणारी चिकित्सा आहे. शरीरातील बिघडलेले वात, पित्त व कफ हे दोष बाहेर टाकले जातात. पंचकर्म केल्याने आजार समूळ नष्ट होतात. हे शरीर शुद्ध करणारे पाच उपाय आहेत. म्हणून त्यांना पंचकर्म म्हणतात.
शरीर शोधनार्थ केल्या जाणाऱ्या पाच उपक्रमा पैकी नस्य अत्यंत महत्त्वाचे कर्म आहे.
*नस्य *
"नासा ही शिरसो द्वार....!'
नाक हे आपल्या शिराचेद्वार आहे. व म्हणुनच मानेच्या वरील सर्व अवयव अर्थात शिर स्थानातील व्याधीसाठी नस्य हा प्रधान उपक्रम आहे.
नस्य नाकावाटे औषध देण्याचे कर्म होय.
*नस्य विधी*
यामध्ये रुग्णाच्या सर्व प्रथम डोळे, कपाळ, गळा, मान व खांदा यांना सिध्द तेलाने मसाज करून(स्नेहन) नंतर शेक (स्वेदन) देतात.
यानंतर पाठीवर झोपवून नाकाचे टोक आकाशाकडे करुन सिध्द औषधाचे थेंब नाकात सोडतात काहीं वेळ आराम करुन रूग्ण सर्व दैनंदिन कामे करू शकतो.
नस्य हे कर्म अत्यंत निर्धोक व त्रासविरहित आहे. यात व्यक्तीची प्रकृती ' व्याधीची तीव्रता' ऋतू जिर्णावस्था यांचा अभ्यास करूनच हे कर्म केले जाते.
*नस्य प्रकार*
नस्य औषधामध्ये बरीच विविधता आहे. उदा. शुध्द गोघृत , औषधी सिध्द तूप, तैल, चुर्ण, धूप तसेच वनस्पती स्वरस या निरनिराळ्या प्रकारानुरुप नस्य केलें जाते
*नस्याचे फायदे*
1) काही नस्य द्रव्ये शरीर शोधनार्थ कार्य करतात तर काही नस्यामुळे शरीर बृहण अर्थात शरीर बल, वर्ण, तेज यांची वृद्धी होण्यास मदत मिळते.
2) नस्याचे फायदे प्रामुख्याने सर्व प्रकारचे वात व्याधी उदा. संधिवात, पक्षाघात (पॅरालीसिस ), विविध शिरोरोग, नासा रोग, कर्ण रोग, मान दुखणे, मणक्याचे विकार इ.
3) केसांच्या तक्रारी गळणे, पिकणे,तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, शरीर शक्तीचा ऱ्हास होणे यामध्ये फायदा होतो.
4) जुनाट सर्दी, श्वास दमा यामध्ये फायदा होतो. नाकातील हाड वाढणे, मांस वाढणे यामध्ये खुप फायदा होतो.
5) मानसिक आजार तसेच झोप न लागणे, यामध्ये नस्यामुळे फायदा होतो.
6) लहान मुलांमध्ये उंची वाढविणे तसेच फिट्स येणे यामध्ये नस्याचा फायदा होतो.
अशा प्रकारे तज्ञ आयुर्वेदाचार्याच्या देखरेखी खाली नस्य हे पंचकर्म करावे त्यामूळे तुम्हाला उत्तम स्वास्थ्य लाभेल यात शंकाच नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ सुमित साळुंखे (आयुर्वेदाचार्य)
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय
भिलवडी, जि. सांगली
मोबा.9822974748
संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.
|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909