लेप चिकित्सा


लेप म्हणजे काय?
    एखाद्या औषधाचे चुर्ण पाण्यात, दुधात, ताकात किंवा इतर द्रव्य पदार्थात एकत्र करून दुखणाऱ्या भागावर लावणे म्हणजे लेप होय.
  *लेपाचे प्रकार*
1) शीत लेप   2) उष्ण लेप
3) अनुष्ण लेप
1) *शीत लेप* :- हा स्पर्शाने थंड असतो. शास्त्रीय भाषेत त्याला 'प्रलेप'असे म्हणतात.
*उपयोग*
      शीत लेप त्वचेला कांती आणण्यासाठी तसेच पित्ताच्या आजारामध्ये उपयोगी पडतो.
2) उष्ण लेप :- लेपाचे औषध द्रव पदार्थात घालून अग्निवर एकत्र केल्याने उष्ण लेप तयार होतो, त्याला शास्त्रीय भाषेत 'प्रदेह' म्हणतात. 
*उपयोग*
    वाताच्या व कफाच्या आजारामध्ये या लेपाचा उपयोग केला जातो.
3) *अनुष्ण लेप*:- हा लेपचा प्रकार जास्त गरम किंवा जास्त थंड नसतो. याला शास्त्रीय भाषेत 'आलेप' असे म्हणतात. 
*उपयोग*
      रक्त खराब होऊन झालेला आजार त्वचेचे आजार यामध्ये अनुष्ण लेपाचा उपयोग केला जातो.



 *मुखलेप*

       चेहऱ्यावर केल्या जाणाऱ्या लेपाला मुखलेप असे म्हणतात.
       सध्याच्या काळात यालाच 'फेसपॅक ' असे म्हणतात
 *मुखलेपाचे उपयोग*
      चेहऱ्याची कांती सुधारणे, चेहऱ्यावरील पिंपल्स, वांगाचे काळे डाग घालविणे.
 *लेप लावण्याचे नियम*
        लेप रात्री लावू नये, लावलेल्या लेपावर दुसरा लेप लावू नये.
       विविध आजारामध्ये लेपाचा उपयोग केला जातो. सुजेवर चाई, पडणे,डोके दुखणे, पोटात दुखणे, सर्दी, सांध्यांची सूज, जुलाब होणे आदी विकारांवर लेपाचा उपयोग केला जातो.
       लेप करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

अधिक माहिती साठी संपर्क 
डॉ. सुमित साळुंखे  (आयुर्वेदाचार्य)  
श्री विश्वहंस आयुर्वेद पंचकर्म व योग चिकित्सालय भिलवडी 
मो. नं 9822974748











संपर्क - डॉ सुमित साळुंखे Call :- 9822 974 748.

|ADVT|पोहचा जगभरातील ग्राहकांपर्यंत क्षणार्धात - सर्व डिजीटल सेवा / वेब पोर्टल्स करिता -Click here/Call- 9890 546 909